वॉटस् अॅपवरील डीपीच्या आधारावर पोलिसांनी भामट्याला पकडले

वॉटस् अॅपवरील डीपीच्या आधारावर पोलिसांनी भामट्याला पकडले
वॉटस् अॅपवरील डीपीच्या आधारावर पोलिसांनी भामट्याला पकडले
See all
मुंबई  -  

एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका भामट्याला मीरारोड पोलिसांनी त्याच्या वॉट्स अॅपवरील डीपीच्या आधारावरून अटक केली आहे. या भामट्याने एटीएममध्ये पैसे काढून देण्याच्या नावाखाली आतापर्यंत मीरा रोडमध्ये 2, नयानगरमध्ये 6, भाईंदरमध्ये 1 आणि काशी मीरामध्ये 2 इतक्या लोकांची फसवणूक केली आहे.

विशेष म्हणजे त्याने केलेला सर्व कारनामा एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सीसीटीव्हीतील दृश्यांमध्ये दिसणाऱ्या आरोपीचे नाव राजू हसमुखभाई भट्ट असे आहे. आधी आरोपी राजू हा एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहून अत्यंत चलाखीने त्या व्यक्तीचा पिन नंबर बघत असे. नंतर मदत देण्याच्या नावाखाली पैसे काढणाऱ्या व्यक्तीचा एटीएम बदलत असे. त्यानंतर दुसऱ्या एटीएमएममध्ये जाऊन पैसे काढत असे. अशा फसवणुकीप्रकरणी मुंबईसह राजस्थानमध्ये देखील त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद आहे. एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्याच्या आधारावर मीरारोड पोलिसांनी या ठकसेनचा शोध सुरू करत त्या एटीएमच्या आसपासच्या परिसरातील मोबाईलचा डेटा पोलिसांनी मागवला. त्या परिसरातून कोणकोणत्या व्यक्तींनी फोन केला त्या सर्वांच्या मोबाईलनंबरची अगदी बारकाईने तपासणी केली. अखेर पोलिसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला. पोलिस निरीक्षक जगदीश शिंदेनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीचा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला, तेव्हा त्यांना आरोपीच्या वॉट्सअॅपवरील डीपी दिसला. त्याचा फोटो सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता होता. तो मोबाईलक्रमांक सर्वेलाईनमध्ये ठेवत पोलिसांनी त्याच आधारावर आरोपीला मुंबईच्या एका डान्सबारमधून अटक केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.