मोबाईल चार्जिंगला असताना उचलू नका, नाहीतर तुमच्याही जीवाला धोका! कसा? ते वाचा...


मोबाईल चार्जिंगला असताना उचलू नका, नाहीतर तुमच्याही जीवाला धोका! कसा? ते वाचा...
SHARES

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना कॉल रिसिव्ह करून नका, असा सल्ला तज्ज्ञ नेहमीच देतात. पण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण मोबाईल चार्जिंग होत असतानाही त्यावरून बिनधास्त गप्पा मारत बसतात. मात्र असे करणे किती घातक ठरू शकते, याचे उदाहरण नुकतेच समोर आले असून वांद्र्यातील एका तरूणाला त्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मूळचा पश्चिम बंगालमध्ये राहणारा तपन गोस्वामी हा २८ वर्षांचा तरूण १५ दिवसांपूर्वीच कामानिमित्त मुंबईत आला होता. वांद्रे पश्चिमेकडील एका भाड्याच्या खोलीत तो दोन मित्रांसोबत राहात होता.


अशी घडली घटना

मंगळवारी संध्याकाळी तपनने आपला मोबाईल फोन चार्जिंग वायरला जोडून ती वायर इलेक्ट्रीक स्वीचमध्ये लावली होती. एवढ्यात त्याला फोन आल्याने त्याने मोबाईल चार्ज होत असतानाच हा फोन रिसिव्ह केला. मात्र फोन रिसिव्ह करताच त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला.

यावेळी त्याला भेटण्यासाठी आलेला त्याचा मित्र संजय तेथे उपस्थित होता. झालेल्या घटनेने घाबरलेल्या संजयने लगेच बाहेर धाव घेऊन शेजारच्यांना मदतीसाठी बोलवले. तपनला तात्काळ भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


डॉक्टरांचे स्पष्टीकरण

तपनचा मृत्यू वीजेच्या धक्क्याने झाल्याची माहिती भाभा रूग्णालयातील डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपनचा मृत्यू वीजेचा धक्का लागून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पावसाचे पाणी स्वीचबोर्डमध्ये गेल्याने वीजेचा प्रवाह चार्जिंग वायरमधून मोबाईलमध्ये उतरला. त्याचवेळेस तपनने कॉल रिसिव्ह केल्याने त्याला वीजेचा धक्का लागल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.



हे देखील वाचा -

...या अभिनेत्रीची कार गेली चोरीला



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा