...या अभिनेत्रीची कार गेली चोरीला


...या अभिनेत्रीची कार गेली चोरीला
SHARES

आतापर्यंत आपण दुचाकी चोरी झाल्याचे ऐकले असाल, पण एका अभिनेत्रीची कारच चोरीला गेल्याची घटना मिरारोडमध्ये घडली आहे.

या अभिनेत्रीचे नाव हेली शाह आहे. टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारी ही अभिनेत्री मिरारोड येथील पूनम गार्डन जवळील शेरेनिट या इमारतीत राहते.



कशी गेली कार चोरीला?

पूनम गार्डन जवळच तिच्या इमारतीला लागून असलेल्या सेलिटर इमारतीसमोर असलेल्या पार्किंगच्या जागेत तिने आपली कार उभी केली होती. 23 ऑगस्टला पहाटे 4 वाजता ती 'देवांशी' या मालिकेच्या शूटिंगला जात होती. पण त्यावेळी तिला तीची कारच जागेवर दिसली नाही. त्यामुळे तिने या प्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता चार चोरांनी ती कार पळवल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.



हेही वाचा - 

टीव्ही अभिनेत्रीचा हरवलेला पती शिर्डीत सापडला!

बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा