विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

 Govandi
विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू

गोवंडी - गोवंडीतील बैंगणवाडी भागात विजेच्या धक्क्याने अत्तार खान (28) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. घरा शेजारीच गटार तुंबल्याने तो या गटारात घाण काढण्यासाठी उतरला होता. दरम्यान गटारात वीजेच्या उघड्या तारेचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या कुटुंबियांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Loading Comments