अॅडमिशनच्या नावाखाली गंडा घालणारा अटकेत


अॅडमिशनच्या नावाखाली गंडा घालणारा अटकेत
SHARES

विलेपार्ले येथील एका नामकित काॅलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. फेरेन पटेल असं या आरोपीचं नाव आहे. फेरेन हा याच काॅलेजचा विद्यार्थी असून त्यानं अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे.


उकळायचा ५-१० हजार

विलेपार्ले नरसी मूंजी काॅलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या अभ्यासक्रमात फेरेन नापास झाला होता. त्यामुळे घरातल्यांनी त्याला घराबाहेर काढलं होतं. काॅलेजमध्येही असभ्य वर्तनामुळे फेरेन सर्वपरिचित होता. घरातल्यांपासून वेगळं झाल्यानंतर तो मीरारोडमध्ये राहत होता. दरम्यान, काॅलेजमध्ये अँडमिशन सुरू झाले की, नवोदित विद्यार्थ्यांना गाठून आपली काॅलेजमध्ये प्राचार्यांपर्यंत ओळख असल्याचं सांगून अॅडमिशन करून देतो, असं अाश्वासन द्यायचा अाणि त्यांच्याकडून पाच ते दहा हजार उकळून पसार व्हायचा.


पुण्याच्या दोघांना फसवलं

नुकतीच त्याची ओळख पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांशी झाली होती. दोघांच्याही घरातले श्रीमंत असल्याचे त्याला समजले होते. या दोघांना इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी फेरेननं १२ जून रोजी मुंबईत बोलावून घेतलं. दोघांना काॅलेजमधील क्लार्कशी ओळख करून दिली. त्यानंतर प्रत्येकी ८ लाख रुपये भरले की अॅडमिशन मिळेल, असं त्यानं बाहेर अाल्यावर सांगितलं. इतक्या मोठ्या महाविद्यालयात डोेनेशन भरण्याची तयारी असतानाही अॅडमिशन मिळत नाही. फेरेनच्या ओळखीवर अॅडमिशन मिळत असल्यानं दोघांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जवळील बँकेतून चेकद्वारे त्याला ८ लाख रुपये काढून दिले.


अाणि झाला पसार

काॅलेजच्या प्राचार्याला पैसे देऊन येतो, असं सांगून फेरेन मागच्या दाराने पसार झाला. रात्री उशिरापर्यंत फेरेन न परतल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुलांच्या लक्षात अाले. त्यानंतर त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्ह्याचा तपास करताना मुलांनी सांगितलेलं वर्णन, काॅलेजमधील कर्मचाऱ्यांकडून घेतलेली माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं फेरेनची ओळख पटली. दरम्यान, फेरेन मुलांनी दिलेल्या पैशांवर मीरारोडमधील हाॅटेलमध्ये मौजमजा करत असताना जुहू पोलिसांनी शुक्रवारी सकाळी फेरेनला अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

रेल्वे रुळांवर ठेवली जाणार 'ड्रोन'ने गस्त

व्हाॅट्स अॅपमुळं सापडला अाजोबांचा ठावठिकाणा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा