लोकल ट्रेनचा बनावट पास बनवणारा अटकेत, तुम्ही पण आलात का याच्या जाळ्यात?

एका तरुणानं थेट फेसबुकवर (Facebook) लोकल ट्रेनचा पास बनवून देतो, असं घोषित केलं.

लोकल ट्रेनचा बनावट पास बनवणारा अटकेत, तुम्ही पण आलात का याच्या जाळ्यात?
SHARES

कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) आणि उपनगरात सर्वसामान्यांना लोकल ट्रेनच्या (Local train) प्रवासावर निर्बंध आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेन प्रवासाची मुभा आहे. असं असताना एका तरुणानं थेट फेसबुकवर (Facebook) लोकल ट्रेनचा पास बनवून देतो, असं घोषित केलं.

त्यानंतर त्यानं अनेकांना बनावट पास बनवून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाचं नाव धनंजय बनसोडे असं आहे. त्याच्याकडून किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलं याचा शोध पोलीस घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे क्राईम ब्राँच युनिटच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, रेल्वेतील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यावर कल्याण रेल्वे क्राईम ब्राँच युनिटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरू केला.

युनिटचे एपीआय अरशद शेख यांच्या पथकानं या व्यक्तिचा शोध सुरू केला. अखेर धनंजय बनसोडे या व्यक्तिला डोंबिवलीहून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून ओळखपत्रे तयार करण्याची सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे.

धनंजय बनसोडे याने ओळखपत्र तयार करुन देण्यासाठी फेसबूकद्वारे लोकांना आवाहन केलं होतं. याच माध्यमातून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनंजय बनसोडे या तरुणाचे आतापर्यंत किती लोकांना प्रमाणपत्र दिले, याचा तपास पोलीस करीत आहेत. धनंजय हा मुंबई येथील एका कॉल सेंटरमध्ये खाजगी कंत्राटदाराकडे कामाला होता. तीन महिन्यांपासून त्याला पगार मिळाली नाही. पैसे कमावण्याच्या लालसेपोटी त्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.हेही वाचा

मुंबईत तीन कोटींचं हेरॉईन जप्त, महिला तस्कराला अटक

NCBकडून अंधेरीचा लोखंडवाला परिसर ड्रग पेडलरसाठी मुख्य केंद्र घोषित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा