धक्कादायक ! चाकूच्या धाकावर पोटच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार

धारावीतील एका बस डेपोजवळ १२ वर्षाची मुलगी एकटीच उभी असल्याचे पाहून आरोपीने तिला बोलावले. त्यानंतर त्याने तिला बोलण्यात गुंतवून एका निर्जनस्थळी नेले.

धक्कादायक ! चाकूच्या धाकावर पोटच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार
SHARES

मुंबईच्या मालवणी परिसरात दोन दिवसांपूर्वी बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच, धारावीत पोटच्या मुलीला चाकूचा धाकदाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकऱणी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.  

हेही वाचाः- यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

धारावी परिसरात १२ वर्षीय पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. पीडित मुलीचे वडिल हे हमालीचे काम करतात, धारावीतील एका बस डेपोजवळ १२ वर्षाची मुलगी एकटीच उभी असल्याचे पाहून  आरोपीने तिला बोलावले. त्यानंतर त्याने तिला बोलण्यात गुंतवून एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी त्याने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली.  मात्र वेदनांनी असह्य झालेल्या मुलीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आजीला दिली.

हेही वाचाः- पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल, भाजपावर गंभीर आरोप

त्यानुसार आजीने धारावी पोलिस ठाणे गाठत, पोटच्या मुलाने नातीवर केलेल्या अत्याचाराबाबत तक्रार नोंदवली. आजीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर धारावी पोलिसांनी कलम ३७६ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी बापाला अटक  केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा