भाजीचा ठेला लावण्यावरून पवईत एकाची हत्या

अमोल आणि भाजी विक्रेत्या आरोपींचे गाडींच्या पार्किंगवरून वारंवार खटके उडायचे.

भाजीचा ठेला लावण्यावरून पवईत एकाची हत्या
SHARES

भाजीचा ठेला लावण्यावरून पवईत वाद विकोपाला गेल्याने एकाची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच पुढे आली आहे. अमोल सुरडकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी पवई पोलिसांनी सचिन सिंग, जितेंद्र उर्फ प्राण या दोघांना अटक केली आहे. 

 पवईच्या साधना हाॅटेलजवळ गोखले नगर येथे आरोपी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तर अमोल हा झोमेटो मध्ये डिलिव्हरी बाॅयचे काम करतो. अमोल आणि भाजी विक्रेत्या आरोपींचे गाडींच्या पार्किंगवरून वारंवार खटके उडायचे. काही दिवसांपूर्वी अमोलचे दोन्ही आरोपींसोबत वाद झाला होता. याच वादातून बुधवारी पहाटे आरोपींनी अमोलला एकटे गाठून त्यांच्यावर चाकून सपासप वार केले आणि पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोलला स्थानिकांनी तातडीने जवळील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

 

या प्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपी कुर्ला टर्मिनलहून उत्तरप्रदेश येथील त्यांच्या मूळ गावी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना मोठ्या शर्तीने अटक केली.     

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा