मागवला आयफोन, मिळाला साबण


मागवला आयफोन, मिळाला साबण
SHARES

सध्या ऑनलाईनचाच जमाना आहे. या ऑनलाईनमुळे अगदी घर बसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर हवी ती वस्तू सहज खरेदी करता येते. वेळ काढून दुकानात जायची गरज भासत नाही. पण या ऑनलाईन शॉपिंगमुळे ग्राहकांच्या फसवणुकीतही वाढ होत आहे. आता फसवणुकीची आणखी एक घटना समोर आली आहे.


आयफोनच्या जागी साबण

सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला तरबेज महबूब नगराली या २६ वर्षांच्या तरुणाने फ्लिपकार्ट या प्रसिद्ध शॉपिंग पोर्टलद्वारे आयफोन-८ हा मोबाईल ऑर्डर केला होता. पण जेव्हा त्याला पार्सल मिळाला तेव्हा त्यामध्ये आयफोनच्या जागी साबण निघाला.


फ्लिपकार्टविरोधात गुन्हा दाखल

विशेष म्हणजे आयफोनची ऑर्डर देतानाच तरबेजने ५५ हजार रुपयांची रक्कम अदा केली होती. याप्रकरणी त्या तरुणाने भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून फ्लिपकार्टविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा