बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास महिलेचा नकार, माथेफिरूनं ज्वालाग्रही रसायन ओतलं

बलात्काराचा (rape) गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने महिलेवर (woman) ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास महिलेचा नकार, माथेफिरूनं ज्वालाग्रही रसायन ओतलं
SHARES

बलात्काराचा (rape) गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने महिलेवर (woman) ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मीरा रोड (Mira Road) मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी (police) या प्रकरणी २ आरोपींना अहमदाबाद (Ahmedabad) मधून अटक (arrest) केली आहे. 

२६ वर्षीय पिडीत महिला भाईंदरच्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला आपली दोन मुलं आणि बहिणीची मुलं यांच्यासह राहते. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ती पायी घरी चालली होती. यावेळी अदानी पॉवर सब स्टेशनकडून ती जात असताना नयानगर भागात राहणारा आरोपी आपल्या मित्रासोबत दुचाकीने आला. काशिमीरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला बलात्काराचा (rape) गुन्हा मागे घेऊन स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यासाठी त्याने तिला धमकावले. परंतु तिने गुन्हा मागे घेण्यास नकार दिला.

महिला तिथून निघाल्यावर आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील द्रव्याने भरलेली बाटली फोडली. तिने आरडाओरडा केल्याने ते दोघे हाटकेशच्या दिशेने पळून गेले. त्या ज्वालाग्रही रसायनामुळे तिच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजुच्या परिसरातील लोक तिथे जमा जाले. काही लोकांनी तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिला उपचारासाठी भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी पेट्रोल किंवा रॉकेलसारखे ज्वलनशील रसायन असल्याचं म्हटलं आहे.हेही वाचा -

रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कळवा फाटकाजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा