रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बोरिवली स्थानकावर (Borivali Station) एका प्रवाशाने आत्महत्या (Suicide) करण्यासाठी रेल्वेखाली उडी मारली.

रेल्वेपुढे उडी मारत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मुंबई (mumbai) त रेल्वे (train) खाली उडी घेत आतापर्यंत अनेकांनी जीव दिला आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर कोणीच यातून वाचण्याची शक्यता नसते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून एक प्रवासी यातून वाचला आहे. बोरिवली स्थानकावर (Borivali Station) एका प्रवाशाने आत्महत्या (Suicide) करण्यासाठी रेल्वेखाली उडी मारली. मात्र, यामध्ये त्याला किरकोळ जखमेशिवाय काहीही झालं नाही. या प्रवाशाचा जीव वाचला आहे. 


२ फेब्रुवारी ही घटना घडली. पश्चिम रेल्वे (western railway) च्या बोरीवली स्थानकात  (Borivali Station) एका प्रवाशाने आत्महत्येसाठी रेल्वेखाली उडी मारली. मात्र, हा प्रवाशी यामधून बचावला. आत्महत्येच्या (Suicide) तयारीत असलेला हा तरूण प्लॅटफार्मवर ट्रेनची वाट पाहत होता. एका प्रवाशाने त्याला आधीच पकडलं होतं. मात्र, स्थानकात ट्रेन शिरताच त्याने रूळांवर उडी घेतली. तो ट्रेनखाली आला. मात्र, ट्रेन गेल्यानंतर तो जीवंत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्याला प्रवाशांनी प्लॅटफार्मवर आणलं. हा तरुण फक्त किरकोळ जखमी झाला आहे.

या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अजून समोर आलेलं नाही. पण सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ (video) आता व्हायरल (viral) झाला आहे. 
हेही वाचा-

'या' नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओचा दणका, ११४ चालकांचे परवाने रद्द

कळवा फाटकाजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
संबंधित विषय