धक्कादायक! पतीने गर्भवती पत्नीला ट्रेनमधून ढकललं

सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपाऱ्याला जात होते. यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण झालं.

SHARE

वाद झाल्याने संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीला रेल्वेतून बाहेर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहीसर आणि मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सागर धोडी (२५) असं आरोपी पतीचं नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपाऱ्याला जात होते. यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण झालं. राग अनावरण न झाल्याने सागरने राणीला ट्रेनमधून बाहेर ढकलले. सुदैवाने राणी यामध्ये बचावली. यावेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीला फारशी इजा झाली नाही तिच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळयांना मार लागला आहे. राणीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचं सांगितलं.  राणीने पोलिसांशी बोलताना सांगितलं की, सागरला मूल नको होते. त्यावरुन तो सतत माझ्याबरोबर भांडण करायचा. या घटनेनंतर सागर फरार झाला आहे. 

 राणी ही सागरची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. सागरचं प्रेमप्रकरण  समजल्यानंतर त्याची पत्नी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर एक नोव्हेंबरला सागरने राणीबरोबर दुसरे लग्न केले. लग्नावेळी राणी सहा महिन्यांची गर्भवती होती. मात्र, सागरला राणीपासून मुल नको होते. त्यामुळे तो तिच्याशी कायम वाद घालायचा.

नेहमीच्या भांडणाला कंटाळून राणी आपल्या आईकडे राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर सागर १५ नोव्हेंबरला तिला भेटायला गेला.  सागरने तिला त्याच्यासोबत मित्राकडे येण्यास सांगितलं. राणी तयार झाल्याने त्यांनी बोरीवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात भांडण सुरु झाले. ट्रेनने दहीसर सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला व तिला बाहेर ढकलून दिले.हेही वाचा -

भाजी महाग विकल्याने भाजी विक्रेत्याचा खून

दीड कोटींच्या ड्रग्जसह नायझेरियनला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या