दीड कोटींच्या ड्रग्जसह नायझेरियनला अटक

भारतातील तरुण मुलांना इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधून तो ड्रग्जची तस्करी करायचा. त्याच बरोबर अनेकदा पार्टींचे आजोयन करून तो त्यात ड्रग्ज विकायचा.

दीड कोटींच्या ड्रग्जसह नायझेरियनला अटक
SHARES

मुंबईला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतेच पोलिसांनी वांद्रे येथून महाविद्यालयीन तरुणांना पार्टीत, हाॅटेलमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्यास एका नायझेरियन नागरिकाला अटक केली आहे. अला कौडीओ बोरिस असं त्याच नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून दीड कोटी रुपयांचं कोकेन हस्तगत केलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 अला बोरिस हा काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. भारतातील तरुण मुलांना इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधून तो ड्रग्ज पुरवायचा. त्याचबरोबर अनेकदा पार्टींचं आयोजन करून तो त्यात ड्रग्ज विकायचा. याबाबतची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अला बोरिसवर पाळत ठेवली. सोमवारी बोरिस मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती. 

शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे, सहाय्यक निरीक्षक बांगर, उपनिरीक्षक पावले यांच्या पथकाने साकीनाका येथील ९० फूट मार्गावरील पेनिन्सुला हॉटेलजवळ त्याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे २२० ग्रॅम कोकेन आढळले. चौकशीमध्ये बोरिस हा बीच तसंच बंगल्यांमध्ये पार्टी आयोजित करून त्यामध्ये अंमली पदार्थ पुरविण्याचे कामही करीत असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -  

भाजी महाग विकल्याने भाजी विक्रेत्याचा खून
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा