सासूच्या अंतिम संस्कारासाठी आला अन् मेहुणीवर बलात्कार केला


सासूच्या अंतिम संस्कारासाठी आला अन् मेहुणीवर बलात्कार केला
SHARES

सासूच्या अंतिम संस्कारासाठी आलेल्या जावयाने मेव्हणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार वांद्रे परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.


काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी वांद्रे परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या अंतिम संस्कारासाठी तिचा जावई शहाबाद किरेशी (बदललेलं नाव) राजकोटवरून आला होता. अंतिम संस्कारानंतर शहाबाद मुंबईतच थांबला.


'अशी' केली सुटका

रविवारी दुपारी सगळे झोपलेले असताना या नराधमाने १६ वर्षीय मेहुणीवर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात शेजारी झोपलेली १० वर्षांची मुलगी उठली असता या नराधमाने तिलाही दम भरला. तेवढ्यात मेहुणीने शहाबादच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत तेथून पळ काढला आणि घडलेला सगळा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला.


गुन्हा दाखल

शेजाऱ्यांनी पीडित तरूणीला घेऊन थेट खेरवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या नराधमावर बलात्कारासह पॅाक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. सोबतच १० वर्षीय मुलीला धमकावण्याचा गुन्हा देखील या नराधमावर दाखल करण्यात आला.


अखेर तावडीत सापडला

आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजताच शहाबादने मु्ंबईतून पळ काढला. खेरवाडी पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी ३ पथक बनवली. मुंबईतून पळून शहाबाद राजकोटला गेला. मात्र तिथेही पोलीस पोहोचल्याने तो पुन्हा मुंबईला परतला.

अखेर गुरूवारी सकाळी खार स्थानकात शहाबाद सासऱ्यांना भेटणार असल्याची खबर खेरवाडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहन कदम आणि त्यांच्या पथकाने सासऱ्यांचा पाठलाग करत खार स्थानकातून शहाबादला अटक केली.

गुरूवारी शहाबादला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहीती खेरवाडी पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा-

सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!

मालाड टोईंग प्रकरण - महिला आयोगाने मागवला पोलिसांकडून अहवाल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा