धावत्या लोकलखाली सळई टाकून घातपाताचा प्रयत्न

झोपमोड झाल्याच्या रागातून लोखंडी सळई धावत्या लोकलखाली टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली

धावत्या लोकलखाली सळई टाकून घातपाताचा प्रयत्न
SHARES

रेल्वे रुळावर सळई टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेच्या (western railway) चर्नीरोड स्थानकाजवळ घडला आहे. अनिल वाघेला (३०) असं रेल्वे रुळावर सळई टाकणाऱ्याचं नाव असून, या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलानं अनिलला अटक केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, झोपमोड झाल्याच्या रागातून लोखंडी सळई धावत्या लोकलखाली टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या प्रकरणी अनिल वाघेला याला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही (cctv) फुटेजच्या मदतीनं अटक केली. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या जलद लोकलखाली कोणी अज्ञाताने लोखंडी वस्तू फेकली. मोठा आवाज झाल्यानं मोटरमननं त्वरित लोकल थांबवली. मोटरमननं उतरून लोकलची तपासणी केली असता बॅटरी बॉक्समध्ये लोखंडी सळई अडकल्याचं निदर्शनास आलं.

ही वस्तू काढण्यासाठी लोकल काही वेळ थांबवण्यात आली. गँगमन, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही वस्तू काढण्यात आली. लोखंडी वस्तू चाकाखाली आली असती तर लोकल रुळावरून घसरलीही असती. याची माहिती मोटरमननं रेल्वे सुरक्षा दलाला दिली आणि त्यानंतर अधिक तपास केला असता स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून लोखंडी वस्तू घेऊन जाताना एक व्यक्ती दिसली.

वाघेला हा बेघर तरुण असून चर्नीरोड स्थानकाजवळीलच (charni road station) पदपथावरच झोपतो. गेल्या काही दिवसांपासून पादचारी पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. या कामामुळं मागील ६ दिवस सतत झोपमोड होत असल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकशीत समोर आलं आहे.हेही वाचा -

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद- चंद्रकांत पाटील


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा