नालासोपारात आठवीतील मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, नराधमाला अटक

पीडीत मुलगी सकाळी शाळेत जात असताना इद्रीस शेख याने तिच्या तोंडावर कपडा टाकून तिला घरात खेचून आणले.

नालासोपारात आठवीतील मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, नराधमाला अटक
SHARES

आठवीत शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर घरात अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.  इद्रीस शेख (३९) असं आरोपीचं नाव आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन इथं ही घटना घडली. मुलीने आरडाओरडा केल्याने तीन मुलांनी तिला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवले. 

पीडीत मुलगी सकाळी शाळेत जात असताना इद्रीस शेख याने तिच्या तोंडावर कपडा टाकून तिला घरात खेचून आणले. तिच्यावर जबरदस्ती करत माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली. मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ३ तरुण धावून आले. त्यांनी तिची सुटका केली. त्यानंतर तरूणांनी इद्रीस शेख याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरोधात पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपीने अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास आता पोलीस करीत आहेत.  अशा नराधमाना फाशी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेवू, असं पीडित मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे. संतोष भुवन बिलालपाडा परिसरात अनेकजण अमलीपदार्थ सेवन करून धुंद झालेले असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी संदीप मिश्रा यांनी केली आहे. हेही वाचा -

बहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची आत्महत्या

विमा कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणारे ९ अटकेत
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा