विमा कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणारे ९ अटकेत

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचं सांगत ताडदेव येथील एका ज्येष्ठ नागरिकाला एका व्यक्तीने फोन केला. तुमची पॉलिसी मॅच्युअर्ड होत असून काही रक्कम भरल्यास दुप्पट बोनस मिळेल, असं त्यांना सांगण्यात आलं.

विमा कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणारे ९ अटकेत
SHARES

विमा कंपन्यांच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या ताडदेव पोलिसांनी आवळल्या आहेत. विमा पॉलिसीवर बोनसचे आमीष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नऊ जणांना नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. देशभरात या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचं सांगत ताडदेव येथील एका ज्येष्ठ नागरिकाला एका व्यक्तीने फोन केला. तुमची पॉलिसी मॅच्युअर्ड होत असून काही रक्कम भरल्यास दुप्पट बोनस मिळेल, असं त्यांना सांगण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकाने तयारी दर्शवल्यानंतर त्या व्यक्तीने विविध बँक खात्यांचा तपशील देऊन साडेतीन लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र, तरीही वृद्धाला बोनस मिळाला नाही. 

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बँक खाती, खातेदार, बँक व्यवहाराचे तपशील, मोबाइल क्रमांक याआधारे तपास सुरू केला. तपासात दिल्लीमधून ही टोळी कार्यरत असल्याचं आढळलं.  यातील काहीजण तुरुंगात असल्याचीही माहिती मिळाली. ताडदेव पोलिसांचे पथक नवी दिल्लीत गेले आणि राजन, रॉबिन, विशाल, विक्की, राज, दिलीप, जितेंद्र, रूपेश, राम अशा नऊ जणांना अटक केली. एक छोटे कॉल सेंटर सुरू करून त्यांचा फसवणुकीचा व्यवसाय सुरू होता.



हेही वाचा -

बहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची आत्महत्या

बोईसरमध्ये १२ बांगलादेशींना अटक


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा