कर्ज फेडण्यासाठी मॅनेजरनंच विकली १३ लाखांची घड्याळं


कर्ज फेडण्यासाठी मॅनेजरनंच विकली १३ लाखांची घड्याळं
SHARES

ठाण्यात राहणाऱ्या एका २६ वर्षीय पठ्ठ्यानं कर्ज फेडण्यासाठी अनोखा मार्ग निवडला. तो नोकरीला असलेल्या दुकानातील तब्बल १३ लाख रुपयांची महागडी घड्याळं विकून त्यानं कर्ज फेडण्याचं ठरवलं. पण या प्रयत्नात त्याला यश अालं नाही. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी नईम हकिकुल्ला खान याला अटक केली आहे. न्यायालयानं नईमला २१ आॅगस्टपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.


पुरता कर्जबाजारी

ठाणे येथील ताहेरबाग आनंद कोळीवाडा परिसरात नईम आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. घरात खाणाऱ्यांची संख्या जास्त आणि कमावणारा फक्त नईम होता. नईम हा नरिमन पाँईट येथील क्राॅस रोड-२ मधील लाॅजिग, रॅडो, टिस्साॅ या महागड्या घड्याळाच्या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. मिळणाऱ्या मिळकतीत नईमचे घर चालत नव्हते. त्यामुळे त्याने अनेकांकडून पैसे उसने घेतले होते. त्यामुळे पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या घरी कायमच रिघ असायची.


अाॅडिटच्या वेळी फसला

शोरूममधील सर्व वस्तूंची जबाबदारीच त्याच्यावर असल्यामुळे दुकानातील १३ लाख ८४ लाख रुपयांची महागडी घड्याळं त्यानं नकळत विकून आपलं कर्ज फेडलं. मात्र शोरूममधील आॅडिटवेळी तो फसला. १३ महागड्या घड्याळांच्या विक्रीचा हिशोब कंपनीच्या आॅडिटरला लागत नसल्यामुळे नईमची चौकशी करण्यात आली. त्यावेळी नईमने ही घड्याळे शोरूममधून चोरून विकल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कंपनीकडून मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार नईमला पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा -

डाॅ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा