अपहरण करणारी महिला टोळी अटकेत

 Mandala
अपहरण करणारी महिला टोळी अटकेत
अपहरण करणारी महिला टोळी अटकेत
See all

मानखुर्द - एका दीड वर्षच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गोवामधून अटक केलीय. आठ दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरातून एका दीड वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. पैसे कमवण्यासाठी शेजारीच राहणाऱ्या योगीता साळे (21) या महिलेनं मुलाचे अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर मुलाला गोवा इथं अडीच लाखात विकलं होतं. यामध्ये तिला आशा ठाकूर(36), नूरजहाँ मुल्ला (40) आणि प्रभावती नाईक (48) या तीन महिलांनी मदत केली होती. या सर्वांना मानखुर्द पोलीसांनी गोव्यावरून अटक केली. त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिलीय.

Loading Comments