क्षुल्लक कारणावरून एकावर हल्ला

 Antop Hill
क्षुल्लक कारणावरून एकावर हल्ला

अँटॉप हील - येथील भरणी नाका परिसरातल्या पांडियन गल्लीत दोन गटात हाणामारी झाली. गल्ली का भाई कोण ? यावरून एका गटातील तरुणाने दुसऱ्या गटातल्या तरुणावर शुक्रवारी हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. कामरान आणि वसीम उर्फ मच्छि भरणी अशी या दोघांची नावे आहेत.

गल्ली भरणी नाका परिसरातील पोलीस अभिलेखावरील दोन टोळीची गेल्या अनेक वर्षांपासून दुश्मनी आहे. गल्ली का भाई कोण? यावरून यांच्यात नेहमीच धुसफूस होत असे. शुक्रवारी संध्याकाळी ओमप्रकाश यादव आपल्या मित्रासह पांडियन गल्ली भरणी नाका येथून जात होता. त्यावेळी कामरान आणि वसीमने त्याच्यावर ट्यूबलाईट आणि धारधार चाकूने हल्ला चढवला. ओमप्रकाशने आणि त्याच्या मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोटावर वार होऊन रक्तबंबाळ झाल्याने ओमप्रकाश जमिनीवर कोसळला. त्यानंतर कामरान आणि वसीमने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यावेळी सुरजने आपल्या काही साथीदारांसह ओमप्रकाशला तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले. ओमप्रकाश गंभीर अवस्थेत पाहून डॉक्टरांनी त्याला तात्काळ अतिदक्षता विभागात हलवले. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पी.पी. काळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे याना कळवले. सह पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि पथक आरोपींच्या मागावर लागले. आरोपी कामरान आणि वसीम उर्फ मच्छिभरणी नाका झोपडपट्टीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली.

Loading Comments