SHARE

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सी विरोधात पीएमएलए कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं अाहे. हे अटक वॉरंट आता रद्द करण्याची मागणी मेहूल चोक्सीनं केली आहे. या प्रकरणी मेहूल चोक्सीनं विशेष सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला आहे.


सहकार्य करण्यास तयार 

 मेहूल चोक्सीनं याआधीही सीबीआयच्या नोटीसीला उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्यानं हे प्रकरण सोडवायचं असं सांगून मी चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहे. मात्र, माझ्यावर चुकीचे आरोप केले असून भारतातील माझा व्यवसाय बंद करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. या घोटाळ्यातील मुख्य अारोपी नीरव मोदी सध्या परदेशात पळून गेला अाहे. मेहूल चोक्सी हा नीरव मोदीचा मामा अाहे.हेही वाचा - 

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास परवानगी

'त्या' वाहतूक पोलिसाची बदलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या