नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास परवानगी


नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास परवानगी
SHARES

पंजाब नॅशनल बँकेचे तब्बल १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मुंबईतील विशेष न्यायालयाने अंमलबजावणी महासंचालनालयाला (ईडी) परवानगी दिली अाहे. न्यायालयाच्या या अादेशानंतर अाता नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू केली जाणार अाहे.


परराष्ट्र मंत्रालयाला दिली माहिती

न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी ईडीला प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली. ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी याबाबत सांगितलं की, या अादेशाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडं पाठवली अाहे. परराष्ट्र मंत्रालय ब्रिटिश सरकारला याबाबत माहिती देईल. ईडीने मंगळवारी विशेष न्यायालयाकडं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता.

पीएनबीचा घोटाळा उघडकीस अाल्यानंतर नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोकसी अाणि अाणखी काही जणांची तपास यंत्रणा चौकशी करत अाहे. नीरव मोदीने १३ हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याची तक्रार पंजाब नॅशनल बँकेने केली होती. 



हेही वाचा -

बँकांचे कर्ज फेडण्यास विजय माल्या तयार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा