आता भारतात येणं अशक्य, चोकसीचं सीबीआयला पत्र

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला सीबीआयने ई- मेलद्वारे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यावर मेहुल चोकसीने आपण हृदयासंबधित आजाराने त्रस्त असून परदेशात आपल्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ४ ते ६ महिने आपल्याला कोणताही प्रवास करण्यास डाॅक्टरांनी मनाई केली असून बेडरेस्ट घेण्यास सांगितल्याचं कळवलं अाहे.

आता भारतात येणं अशक्य, चोकसीचं सीबीआयला पत्र
SHARES

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी व गीतांजली जेम्सचा प्रवर्तक मेहुल चोकसीने भारतात परत येणं अशक्य असल्याचा ई-मेल सीबीआयला केल्याचं समोर आलं आहे. प्रकृती खराब असल्याने शिवाय भारताने पासपोर्ट निलंबित केल्याचं कारण पुढे करत चोकसीने सीबीआयला चुचकारलं आहे.

आजाराचं कारण पुढे

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला सीबीआयने ई- मेलद्वारे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यावर मेहुल चोकसीने आपण हृदयासंबधित आजाराने त्रस्त असून परदेशात आपल्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ४ ते ६ महिने आपल्याला कोणताही प्रवास करण्यास डाॅक्टरांनी मनाई केली असून बेडरेस्ट घेण्यास सांगितल्याचं कळवलं अाहे.

धमकीचे फोन

तसंच पीएनबी घोटाळ्यात आपला पासपोर्ट भारताने निलंबित केल्याने आपल्याला भारतात परत येणं अशक्य असल्याचं सात पानी पत्रातून राहुलने ई-मेलद्वारे स्पष्ट केलं आहे. या घोटाळ्यात नाव आल्याने आपल्याबरोबर व्यावसायिक संबध असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचंही म्हटलं आहे.

चोकसीने पीएनबीसोबत व्यावसायिक साथीदारांनाही गंडवल्याचं कळत आहे. तूर्तास सीबीआयकडून चोकसी आणि मोदीला भारतात घेऊन येण्यासंदर्भात इतर देशांसोबतची प्रक्रीया सुरू आहे.

हेही वाचा-

'पीएनबी' घोटाळ्यानंतरही नीरव मोदीचे व्यापाऱ्यांशी व्यवहार सुरूच

पीएनबी घोटाळा: मेहुल चोकसीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा