'त्या' वाहतूक पोलिसाची बदली


'त्या' वाहतूक पोलिसाची बदली
SHARES

काही दिवसांपूर्वी पावसात अडकलेल्या लोकांना नितीन नायर या युवकाने अापल्या कारमध्ये लिफ्ट दिली होती. त्यामुळे एका वाहतूक पोलिसाने त्याला दंड अाकारला होता. याप्रकरणी रबाळे वाहतूक पोलीस ठाण्यातील या कॉन्स्टेबलवर कारवाई करत त्याची बदली करण्यात अाली अाहे. या प्रकरणाची माहिती नितीनने फेसबुकवर पोस्ट टाकून दिली होती.

सोशल मिडीयावरून व्हायरल झालेल्या या प्रकरणाच्या तपासाचे अादेश वाशी पोलीस स्थानकातील निरीक्षकाला देण्यात अाले अाहेत. दंडाची पावती फाडल्यानंतर नितीनला न्यायालयातही हजर केलं होतं. न्यायालयाने दंडामध्ये ५०० रुपयांची सूट देत नितीनला १५०० रुपये दंड ठोठावला होता.


काय अाहे प्रकरण ?

नितीनच्या फेसबुकवरील पोस्टनुसार, नितीन अंधेरीतील अापल्या अाॅफिसमध्ये जात असताना मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी पावसात अडकलेले काही लोक त्याला दिसले. या लोकांना मदत करण्यासाठी नितीनने त्यांना अापल्या कारमध्ये लिफ्ट दिली. ज्या लोकांना नितीनने लिफ्ट दिली त्यामध्ये एक ६० वर्षीय ज्येष्ट नागरिकही होते. यावेळी तेथे काही वाहतूक पोलीस अाले. त्यांंनी नितीनच्या कारचे फोटो काढले. अनोळखी लोकांना मदत करणे बेकायदेशीर अाहे असं सांगत वाहतूक पोलिसाने त्याला दंड अाकारला. 



हेही वाचा -

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास परवानगी

जोगेश्वरीत घरकाम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा