पेट्रोल पंपावर गावगुंडांचा हैदोस

Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला फोनवर बोलण्यास नकार दिल्याने गुंडांना बोलावून त्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पीडित व्यक्तीचं नाव समीर देसाई असं असून ते गोरेगाव (पू.) परिसरात असलेल्या कार केअर या पेट्रोल पंपमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात.

२१ मार्चला एक व्यक्ती अॅक्टिव्हावरून पेट्रोलपंपावर आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील तिथे आला. गाडीत पेट्रोल भरत तो व्यक्ती मोबाईल फोनवर देखील बोलत होता. ते पाहून समीर यांनी त्या व्यक्तीला फोनवर बोलण्यास मनाई केल्याने रागाच्या भरात समीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच समाधान न होता त्याने आणखी चौघांना बोलावून समीरला मारहाण केली. त्यानंतर पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी १०० नंबरवर पोलिसांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्धा तास झाला तरी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे समीर चांगलेच जखमी झाले. अर्ध्या तासानंतर पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून घेत आपले हात झटकल्याचे समीरने सांगितले.

Loading Comments