पोलीस वसाहतीत अल्पवयीनचा विनयभंग, भाजी विक्रेत्याला अटक


पोलीस वसाहतीत अल्पवयीनचा विनयभंग, भाजी विक्रेत्याला अटक
SHARES

गुन्हेगारांना पोलिसांचा जणू धाकच राहिलेला नाही. दिवसेंदिवस मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. आता पश्चिम उपनगरात चक्क पोलीस वसाहतीतच एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिंकू निशाद (२५) नावाच्या भाजी विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. रिंकू निशादला विनयभंग त्याच बरोबर पॉक्सो कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.


आरोपी पोलिसांच्या ताब्यात

१५ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही पश्चिम उपनगरातील पोलीस वसाहतीत राहते. मुलीचं घर हे तळ मजल्यावर असून बुधवारी रात्री ती नेहमीप्रमाणे आपल्या बेडरुमधे झोपली होती. तेव्हा त्याच परिसरात भाजी विक्री करणारा रिंकू निशाद तिथे आला आणि त्याने खिडकीतून हात टाकत या १५ वर्षाच्या अल्पवयीनचा विनयभंग केला. या घटनेने मुलगी धास्तावली खरी पण तिने तात्काळ आरडाओरड केला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनीच बाहेर जाऊन रिंकूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिकूला भादंवि ३५४ त्याचबरोबर बाल कायद्याच्या ८ आणि १२ कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेच्या वेळी आरोपी हा मद्युधुंदावस्थेत होता. चोरी करण्याच्या उद्देशाने रिंकू तिथे आल्याची शक्यता देखील यावेळी पोलिसांनी वर्तवली आहे.


हेही वाचा - 

महिलांचा विनयभंग करणारी 'अॅक्टिव्हा गँग' मुंबईत सक्रिय

चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा