महिलांचा विनयभंग करणारी 'अॅक्टिव्हा गँग' मुंबईत सक्रिय

  Mumbai
  महिलांचा विनयभंग करणारी 'अॅक्टिव्हा गँग' मुंबईत सक्रिय
  मुंबई  -  

  महिलांनो, रस्त्यावरून चालताना सावधान! तुम्ही रस्त्याने जात असाल आणि समोरुन एखादी अॅक्टिव्हा गाडी येत असेल, तर काळजी घ्या. कारण त्या अॅक्टिव्हावर बसलेल्या व्यक्ती 'अॅक्टिव्हा गँग'च्या सदस्य असू शकतात. ही टोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांचा दिवसाढवळ्या विनयभंगकरते आणि काही कळायच्या आतच पसार होते.

  गेल्या काही दिवसांमध्ये विनयभंगाच्या, महिलांसमोर अश्लिल चाळे करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लहान लहान मुलांनाही हे नराधम आपलं लक्ष्य बनवत आहेत. पवईत लहान मुलांवर बलात्कार प्रकरणातून हेच धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मात्र आता चालत्या गाडीवर दिवसाढवळ्या महिलांचा विनयभंग करणारी टोळी सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

  खार-वांद्रे परिसरात या टोळीने तिघा महिलांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या मुलीला ही टोळी हेरते आणि तिला आपले लक्ष्य करते. अॅक्टिव्हावरून फिरणारा हा नराधम कधी एकटा फिरतो तर, कधी त्याचा साथीदार त्याच्या मागे बसलेला असतो. आपली अॅक्टिव्हा स्कूटर घेऊन हा नराधम निर्जनस्थळी रस्त्यावर बसलेला असतो. कोणी एखादी तरुण मुलगी किंवा महिला दिसली की, तिचा विनयभंग करतो. महिलेला काही कळण्यापूर्वीच तो तिथून पळ काढतो. विशेष म्हणजे कोणत्याही घटनेत या नराधमाने महिलेची कोणतीही वस्तू चोरलेली नाही.

  काही दिवसांपूर्वी 21 वर्षांची मुलगी पाली हिल येथून कामाला जात असताना अचानक हा नराधम तिच्या समोर आला आणि तिचा विनयभंग करून तिथून पसार झाला. मुलगी त्याच्या पांढऱ्या अॅक्टिव्हाचा नंबर लिहून घेईल तोवर तो दिसेनासा झाला होता. या घटनेच्या काही दिवसात असाच प्रकार कार्टर रोडवर देखील घडला. यावेळी घरकाम करणाऱ्या एका महिलेला या अॅक्टिव्हा चालकाने लक्ष्य केले आणि तेथून पोबारा केला. या घटनेनंतर पोलिसांनी कित्येक दुचाकी चालकांची चौकशी केली खरी, पण हा नराधम काही सापडलाच नाही. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार वांद्र्यात देखील घडला होता. जिथे एका अनोळखी बाईकस्वाराने महिलेला लक्ष्य केले होते.

  दिवसागणिक अशा घटना समोर येत असल्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.  हेही वाचा -

  अश्लील चाळे करणाऱ्याला तरुणीने शिकवला धडा

  या विकृतांना ठेचायलाच हवं!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.