अश्लील चाळे करणाऱ्याला तरुणीने शिकवला धडा

  Oshiwara
  अश्लील चाळे करणाऱ्याला तरुणीने शिकवला धडा
  मुंबई  -  

  गेल्या काही महिन्यांत मुंबईत महिला, तरुणी आणि अल्पवयीनांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यातच इमारतीच्या टेरेसवर उभा राहून एक विकृत अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार ओशिवरा परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला. त्याची क्लिप काढून एका तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर ओशिवरा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

  ओवैस युसूफ शेख (20) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. जो ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या पाटलीपुत्र इमारतीत राहतो. दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या इमारतीच्या टेरेसवर गेला आणि कपडे काढून त्याने अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब सहाव्या मजल्यावर असलेल्या एका तरुणीने पाहिली आणि तिने मोबाईल क्लिप तयार केली.

  ओशिवरा पोलिस ठाण्यात जाऊन तिने हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रारही दाखल झाली. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर शेख पसार झाला होता. पण तो सोमवारी रात्री ओशिवरा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. 

  याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुभाष खानविलकर यांनी दुजोरा दिला आहे. शेखने जबाबात 'कपडे काढून मी व्यायाम करत होतो', असे पोलिसांना सांगितले आहे. मात्र तक्रारदार तरुणीने पोलिसांना दिलेल्या क्लिपमध्ये मात्र तो अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचेही खानविलकर यांनी सांगितले.  हेही वाचा -

  या विकृतांना ठेचायलाच हवं!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.