चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीनला दोरीने बांधून ठेवलं

चोरीच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात नागरिकांनी दोरीने बांधून ठेवल्याचा प्रकार विरारमध्ये उघडकीस आलाय. विरारच्या कारगिलनगर येथील जयदीप चाळीतल्या रहिवाशांनी एका मुलीला मोबाइल चोरीच्या आरोपाखाली पकडून ठेवलं. मात्र तिला पोलिसांच्या हवाली करण्याऐवजी दोरीने बांधून ठेवले. त्यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. तिला बांधून ठेवत रहिवाशांनी तिच्याकडे विचारणा केली असता मोबाइल आणि पैसे चोरी केल्याची कबुली तिने दिली. त्यावेळी तिथे जमलेल्यांनी देखील मुलीला सोडवण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका निभावली. पण प्रकरण शांत झाल्यानंतर अखेर पोलिसांनी मुलीची सुटका केली.

Loading Comments