अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवून बलात्कार

Mira Bhayandar
अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवून बलात्कार
अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवून बलात्कार
See all
मुंबई  -  

अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवून दोघांनी एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मिरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

मीरारोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही विद्यार्थिनी आहे. आरोपी अमैया राकेश भावसार हा देखील विद्यार्थीच आहे, तर दुसरा आरोपी शुभम लालबिहारी पाठक हा चालक असून तो सध्या फरार आहे. यामधील आरोपी शुभम हा पीडित मुलीच्या आसपासच्या परिसरात राहणारा आहे. फरार आरोपी राजेश याने आपण मालिकेचा निर्माता असल्याची बतावणी केली होती. पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख काही दिवसांपूर्वी झाली होती. दोन्ही आरोपींनी पीडितेला मालिकेत अभिनय करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. 9 जून रोजी दोन्ही आरोपींनी कथित मालिकेचा निर्माता राजेश याच्याशी भेट घडवून देण्यासाठी पीडितेला गोराई येथे नेले. निर्मात्याशी भेट घडवून दिल्यानंतर त्या दोघांनी पीडितेला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिला दारू पाजली आणि तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.