छतावर सापडला चिमुरड्याचा मृतदेह

 Worli
छतावर सापडला चिमुरड्याचा मृतदेह

वरळी - मोतीलाल नेहरूनगरच्या मद्रासवाडीत दोन वर्षांच्या चिमुरड्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यश्वीन देवेंद्र असे या मुलाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह शेजारील घराच्या छतावर सापडला. यश्वीनच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्या तरी त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव येत होता. सध्या यश्वीनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी आईने यश्वीनला खेळायला पाठवले. पण त्यानंतर तो एकाएक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या तो सापडला नाही. शेवटी वरळी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी यश्वीनच्या शेजारील एका घराच्या छतावरून रक्त ठिबकत असल्याचे दिसले. छताची पाहणी केली असता तिथे यश्वीनचा मृतदेह सापडला. "यश्वीनच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याची आई लक्ष्मी ही तिच्या माहेरीच रहाते. आमचं कोणाशीही शत्रुत्व नाही," अशी प्रतिक्रिया यश्वीनचे मामा सुनील देवेंद्र यांनी दिली आहे. या प्रकरणी आम्ही यश्वीनचा मृतदेह शविच्छेदनाला पाठवला असून तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी प्रवीण पडवळ यांनी दिली.

Loading Comments