मनोज साने 'सेक्स अॅडिक्ट'; पॉर्न व्हिडिओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

मनोज साने 'डेटिंग अॅप्स'वर सक्रिय होते आणि त्याद्वारे तो अनेक मुलींच्या संपर्कात होता

मनोज साने 'सेक्स अॅडिक्ट'; पॉर्न व्हिडिओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
SHARES

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात आठवडाभरानंतर नवी माहिती समोर आली आहे. एकिकडे या प्रकरणातील आरोपी मनोज साने याने सरस्वतीला मारले नसल्याचे म्हटले आहे. तर तिने स्वत:हून विश प्राशन केले असा दावा केला आहे. मी घाबरून मृतदेहाचे तुकडे केले असे कबूल केले आहे.

डेटिंग अॅपवर अॅक्टिव्ह

आता यात समोर आलेल्या माहितीनुसार, सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने डेटिंग अॅपवर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यानंतर सरस्वती आणि त्याच्यात भांडण झाले. त्या भांडणातून सरस्वतीची हत्या झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

मात्र आरोपी साने यांनी सरस्वतीची हत्या नेमकी कशी केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मनोज साने हा सेक्स अॅडिक्ट होता. तो सतत पॉर्नोग्राफिक वेबसाईटवर सक्रिय असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

मोबाईलमध्ये अश्लिल फोटो

मनोज साने 'डेटिंग अॅप्स'वर सक्रिय होता आणि त्याद्वारे तो अनेक मुलींच्या संपर्कात होता. हे लक्षात आल्याने सरस्वती आणि मनोज साने यांच्यात भांडण झाले. या भांडणातून तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज साने याला सेक्सचे व्यसन होते. तो सतत पॉर्न वेबसाइटला भेट देत होता. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील फोटो सेव्ह केल्याचेही आढळून आले आहे.

सरस्वतीने आत्महत्या केल्याचा सानेचा दावा पोलिसांना मान्य नाही. “मनोज सानेनेच तिची हत्या केली आहे. मात्र, हा खून नेमका कसा झाला याचा तपास करत आहोत, असे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.

मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी चाकूला धार करायचा

सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साने यांनी विद्युत करवतीचा आणि चाकूचा वापर केला. खून केल्यानंतर त्याने धार लावून चाकू आणला. मृतदेहाचे तुकडे करताना विद्युत करवतीची साखळी गेली. त्यामुळे तो दुरुस्तीसाठी ठेवला होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी साने यांच्या घरातून कीटकनाशक जप्त केले आहे. हे कीटकनाशक प्राशन केल्याने सरस्वतीचा मृत्यू झाला असेल का? याचा तपास पोलीस करत आहेत. जेजे हॉस्पिटलमधून मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहे.

सरस्वती एकाकी जीवन जगत होती

सरस्वती वैद्य यांनी एकाकी जीवन जगत होती. ती कोणाच्याही संपर्कात नव्हती. सानेशिवाय ती कुणालाही ओळखत नव्हती आणि कुणीही तिला ओळखत नव्हते. सानेने तिच्या बहिणींना संपर्क करू दिला नाही. ती दिवसभर घरीच असायची. या काळात ती ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाली. साने तिचा मोबाईल वापरत असे.

गुरुवारी वैद्यकीय चाचणी

मनोज साने यांनी पोलिसांना एचआयव्हीची लागण झाली असून तो नपुंसक असल्याचे सांगितले होते. त्याच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी त्याची गुरुवारी पुन्हा वैद्यकीय चाचणी केली जाईल.



हेही वाचा

मुंबईत ताज हॉटेलजवळ पोलिसांनी पाठलाग करून संशयास्पद कार थांबवली

Exclusive : अजब चोरीची गजब कहाणी! तरुणांचा सापळा आणि चोर जाळ्यात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा