तुम पाकिस्तानी इधर रहनेका नही

रिक्षाची धडक या तीन आरोपींच्या स्कूटरला लागली. त्यावरून या तीन ही आरोपींनी अझरूद्दीन यांना "तुम पाकिस्तानी इधर रहनेका नही, पाकिस्तान जाओ" असे म्हणून त्यांना शिविगाळ करून हाताने मारहाण करत, कांजुर गावाच्या दिशेने पळून गेले.

तुम पाकिस्तानी इधर रहनेका नही
SHARES
देशात माॅब लिंचिंगच्या घटनांमुळे आधीच वातावरण तापलं असताना विक्रोळी परिसरातील अझरूद्दीन जमीरहुल कुरेशी हा रिक्षा चालकही अशाच एका घटनेला बळी पडला आहे. ट्रिपल सीट असलेल्या बाईकला रिक्षाची धडक बसल्याच्या शुल्लक कारणावरून तिघांनी अझरूद्दीनला पाकिस्तानात जा असं म्हणत मारहाण केली. 

इधर रहनेका नही

विक्रोळी परिसरात राहणारे अझरूद्दीन जमीरहुल कुरेशी हे १९ आॅगस्ट रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईहून भांडुपच्या दिशेने भाडे घेऊन  जात होते. त्यांची रिक्षा कांजुर गाव बस बस स्टॉप येथे आली असताना रिक्षाची धडक बाईकला बसली. या बाईकवरून तिघेजण जात होते. तिघांनी अझरूद्दीन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. अझरूद्दीन यांना 'तुम पाकिस्तानी इधर रहनेका नही, पाकिस्तान जाओ' असं  म्हणत त्यांना मारहाण केली.  त्यानंतर तिघेही कांजुर गावाच्या दिशेने पळून गेले. 

एक अल्पवयीन 

या प्रकरणी अझरूद्दीन यांनी विक्रोळी पोलिसात कलम ३४२,३२३,५०४, २९८, ३४ भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या तीनही तरुणांना शोधून काढत ताब्यात घेतले. यामध्ये एकजण अल्पवयीन आहे. त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.  या प्रकरणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहे.हेही वाचा -
संबंधित विषय