COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा

राज यांच्या चौकशी दरम्यान कार्यकर्त्यांकडून कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील अशी घटना घडू नये यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना १४४ व १४९ सीआरपीसी नुसार नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा
SHARES

'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. या चौकशीसाठी गुरूवारी राज ठाकरे  उपस्थित राहणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईसह महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या दृष्टीकोनातून पोलिसांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटिसा पाठवल्या आहेत.


मनसेची बैठक

माहीम इथं असलेल्या मनसेच्या 'राजगड' या मुख्यालयावर मंगळवारी बैठक झाली. त्यावेळी राज ठाकरे ज्या दिवशी 'ईडी'च्या समोर चौकशीला जातील, त्याच दिवशी राज्यभरातील मनसेचे कार्यकर्तेही 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहणार असल्याचं ठरलं होतं. मात्र खुद्द राज यांनी ईडी कार्यालयाबाहेर न जमण्याचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे. मात्र, राज यांच्या चौकशी दरम्यान कार्यकर्त्यांकडून कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील अशी घटना घडू नये यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना १४४ व १४९ सीआरपीसी नुसार नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.  


सीआरपीसी म्हणजे काय?

राजकीय किंवा आंदोलनांना हिंसक वळण मिळतं. यामध्ये शासकीय यंत्रणेचं मोठं नुकसान केलं जातं. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो.  परिसरात शांतता प्रस्थापित रहावी यासाठी पोलिसांकडून १४४ व १४९ अंतर्गत संबंधितांना पूर्व नोटीस देऊन ताकीद दिली जाते.हेही वाचा  -

Video: ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या, राज ठाकरेंना आलेल्या ‘ईडी’च्या नोटीशीमुळे उचललं टोकाचं पाऊल?

छायाचित्रकाराची बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा