Video: ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या, राज ठाकरेंना आलेल्या ‘ईडी’च्या नोटीशीमुळे उचललं टोकाचं पाऊल?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेत मंगळवारी आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेत मंगळवारी आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचनालया (ED)कडून नोटीस बजावण्यात आल्याने प्रवीणने आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु तशा संदर्भात कुठलाही पुरावा प्राथमिक चौकशीत आढळून न आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.  


कळव्यातील विटावा परिसरात आई-वडिलांविना राहणाऱ्या प्रवीणला दारूचं व्यसन होतं. त्याने याआधीही ३ ते ४ वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दारुच्या नशेतच त्याने आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

मात्र, दुसरीकडं राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने प्रवीणने आत्महत्या केल्याची ठाणे परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यापासून प्रवीण तणावात होता. ईडीच्या नोटिशीचा विरोध करण्यासाठी त्याने फेसबुकवर १ हजारहून अधिक पोस्ट देखील केल्या होत्या, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयाने दिली.

परंतु प्राथमिक चौकशीत अशी कुठलीही बाब समोर आलेली नाही. तसंच घटनास्थळी कोणती चिठ्ठी देखील सापडली नाही, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली. हेही वाचा-

'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना

चूक नसेल, तर घाबरण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोलासंबंधित विषय
ताज्या बातम्या