'सनबर्न फेस्टिव्हल'च्या कटातील मुख्य आरोपीस अटक

धर्मरक्षणासाठी त्यांना हे करायचे असल्याचे स्पष्टीकरण चौकशीत आरोपींनी दिले होते. त्यात माजी नगरसवेक श्रीकांत पांगारकर हा आर्थिक मदत करणार होता,

SHARE
पुण्यातल्या ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ (Sunburn music festival) मध्ये घातपात घडविण्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपीस एटीएस (Ats) ने पश्चिम बंगाल (West Bengal) येथून अटक (arrest) केली आहे. प्रसाद जुदिष्टर हजारा उर्फ प्रताप हजारा (३४) असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात या पूर्वी पोलिसांनी १२आरोपींना अटक केले असून प्रसादनेच इतर आरोपींना गावठी बाँम्ब (Bomb) बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.

पुण्यात २०१७ मध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हल (Sunburn music festival) मध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा कट एटीएस (Ats) ने उधळला. या कटात मुख्य आरोपी वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांच सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. या प्रकरणी एटीएसने सुरूवातीला वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या चारही आरोपींना  अटक केली. शरद कळसकरकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कॉम्प्युटरमधून हे आरोपी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात तसेच बेळगावात ‘पद्मावत’ सिनेमाच्या शोदरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचे पुढे आले. 

धर्मरक्षणासाठी त्यांना हे करायचे असल्याचे स्पष्टीकरण चौकशीत आरोपींनी दिले होते. त्यात माजी नगरसवेक श्रीकांत पांगारकर हा आर्थिक मदत करणार होता, असे त्यातून उघड झाल्याचे एटीएसने सांगितले. माञ या कटात महत्वाची भूमिका म्हणजेच आरोपींना बाँम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणारा मुख्य आरोपी प्रसाद हा फरार होता. पोलिस त्याच्या मागावर असल्याने तो नाव बदलून पश्चिम बंगालमध्ये वावरत होता. याबाबतची माहिती एटीएस (Ats) ला मिळाल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगाल (West Bengal) च्या उष्ठी येथून अटक केली. प्रसादची अटक ही या गुन्ह्यातील महत्वाची मानली जात आहे.  त्याच्या चौकशीतून पोलिसांना इतर आरोपींपर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचे मत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वैभव राऊत (vaibhav raut) च्या घरातून जो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्यासाठी वापरण्यात येणार होता. हा सगळा शस्त्रपुरवठा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून झालेला आहे. राऊत आणि गोंधळेकर यांनी शस्त्रप्रशिक्षण प्रसादकडून घेतले होते. ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आले त्यातील दोन केंद्रे महाराष्ट्रात आहेत तर बाकीची अन्य राज्यांमध्ये आहेत. आरोपींचा संवाद कोडवर्डमध्ये व्हायचा. राऊत हा अटकेतील अन्य आरोपी व काही व्यक्तींच्या संपर्कात होता. या सर्वांमधील कोडवर्डमधला संवाद नेमका काय होता, याची चौकशी केली जाणार असून त्यातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागतील.
संबंधित विषय
ताज्या बातम्या