आजीनं मिळवून दिला न्याय, नातीवर बलात्कार करणाऱ्या मुलाचीच पोलिसात तक्रार

१३ वर्षांच्या नातीवर आपल्या मुलानेच म्हणजे त्या मुलीच्या बापानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आजीनं मिळवून दिला न्याय, नातीवर बलात्कार करणाऱ्या मुलाचीच पोलिसात तक्रार
SHARES

१३ वर्षांच्या नातीवर आपल्या मुलानेच म्हणजे त्या मुलीच्या बापानेच बलात्कार केल्याची (Rape On Daughter BY Father) तक्रार एका आजीनं केली होती. आता या नराधम बापाला २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील ही घटना आहे.

पॉस्को कोर्टानं (Posco Court) केवळ तीन महिन्यांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून ही शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश भारती काळे (Special Judge Bharati Kale) यांनी हा निर्णय दिला. याबद्दलचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'नं प्रसिद्ध केलं आहे.

१३ वर्षांची मुलगी 10X10 च्या खोलीत तिचे वडील, आजी-आजोबा, काका आणि भावंडांबरोबर राहते. तिची आई सात वर्षांपूर्वीच घर सोडून गेली आहे. रात्री सगळे झोपलेले असताना हा नराधम बाप आपल्या सख्ख्या पोरीवरच घरातल्या एका कोपऱ्यात लैंगिक अत्याचार करत असे.

एक वर्षभर हा त्रास सहन केल्यानंतर अखेर या मुलीनं आपल्या आजीला हा प्रकार सांगितला. आपले वडील आपल्याला त्रास देतात आणि कुणाला न सांगण्याची धमकीही देतात असं या मुलीनं सांगितलं. हे ऐकल्यावर अर्थातच आजीला धक्का बसला. त्यानंतर सख्ख्या मुलाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली.

'खरंतर बापाला शिक्षा झाल्यानंतर या मुलांचा सांभाळ या 60 वर्षांच्या आजीलाच करावा लागणार आहे. या वयातही तिला हा त्रास सहन करावा लागणार असूनही तिनं आपल्या नातीला न्याय मिळावा यासाठी दाद मागितली, हे कौतुकास्पद आहे,' असं विशेष न्यायाधीश भारती काळे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

ट्विटरवरील तक्रारीनंतर संजय पांडेंची कारवाई, ७ पोलिसांची बदली

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCBला ६० दिवसांची मुदतवाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा