गोवंडीत कचऱ्याच्या ट्रकखाली येऊन लहानग्याचा मृत्यू


गोवंडीत कचऱ्याच्या ट्रकखाली येऊन लहानग्याचा मृत्यू
SHARES

कचऱ्याच्या ट्रकखाली येऊन ३ वर्षांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. मोहम्मद गौस दस्तगीर अहमद असं या लहानग्याचं नाव आहे.


कशी घडली घटना?

मोहम्मद आपल्या कुटुंबीयांसोबत शिवाजी नगर परिसरातील प्लाॅट क्रमांक २८-२९ मधील रस्ता क्रमांक ४ इथं रहात होता. दुपारी तो आपल्या बहिणीसोबत घरातून बाहेर पडल्यावर समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडला गेला. या रस्त्यावरून देवनार डम्पिंग ग्राऊंडला कचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकची सतत वर्दळ असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.

मोहम्मदचे वडील कामानिमित्त दुबईला रहात असून त्याला चार बहिणी आहेत. या लहानग्याच्या जाण्यामुळे परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.



हेही वाचा-

नीरव मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

त्या चिमुरडीला दिला कामा रुग्णालयाने आश्रय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा