आ. तारासिंग यांची गाडी घुसली पोलीस चौकीत, हवालदार जखमी


आ. तारासिंग यांची गाडी घुसली पोलीस चौकीत, हवालदार जखमी
SHARES

भाजपाचे मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीला झालेल्या अपघातात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला तर एक पोलीस हवालदारही जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ज्या भरधाव वेगाने ही गाडी चौकीत घुसते तो वेग अंगावर काटा आणणारा आहे.



गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आमदार तारासिंग यांचा ड्रायव्हर महेंद्र गुप्ता सिंग यांना नांदेडला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सोडून घरच्या दिशेने परतत होता. तेव्हा एलबीएस रोडवर अचानक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी सरळ ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीत धडकली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच गाडी या चौकीत घुसली.



ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैदही झाली. या दुर्घटनेत रस्त्यावरील दोन कुत्र्यांना गाडीने चिरडले. सोबत चौकीतील कॉन्स्टेबल उमेश इसी हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. गाडी भिंत तोडून थेट त्यांच्यावरच चढली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे या दुर्घटनेत गाडीचे देखील नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.



हे देखील वाचा -

भायखळ्यात पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की, दोघांना अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा