काँग्रेस ऑफिस तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेसह ७ मनसे कार्यकर्त्यांना अटक


काँग्रेस ऑफिस तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेसह ७ मनसे कार्यकर्त्यांना अटक
SHARES

काँग्रेस ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह ७ मनसे कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या वृत्ताला मुंबई पोलीस प्रवक्ते दिपक देवराज यांनी दुजोरा दिला असून सध्या या प्रकारणाचा तपास सुरु असल्याचं ते म्हणाले.

देशपांडे यांच्यासह ७ मनसे कार्यकर्त्यांना दंगल, ट्रेस पासिंग, मालमत्ता नुकसान शांतता भंग केल्याच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. शनिवारी या सगळ्यांना किल्ला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.


काय आहे प्रकरण?

शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाजवळील काँग्रेसच्या कार्यालयात काही अनोळखी इसम घुसले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरूवात केली. यावेळी काठ्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमधील काचा फोडल्या. तसेच फर्निचरचीही तोडफोड केली.

सध्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि मनसे आमने-सामने आले असून याच वादाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचं समजत आहे. मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून झालेली मारहाण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रूचली नव्हती.



हेही वाचा-

काँग्रेसला इंदिराजींच्या शब्दांत मनसेचं प्रतिउत्तर 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा