थापाड्या हवालदाराने ८५ लाखांना 'असं' गंडवलं


थापाड्या हवालदाराने ८५ लाखांना 'असं' गंडवलं
SHARES

कुणाला स्वस्तात घर मिळवून देतो, तर कुणाला सरकारी नोकरीला लावण्याचं आश्वासन देत ठाण्याच्या एका पोलिस हवालदाराने अनेकांना ८५ लाख रुपयांना गंडवल्याची घटना पुढे आली आहे. अनंतप्रसाद देवीदास पांडे (५०) असं या अटक झालेल्या हवालदाराचं नाव आहे. पांडेच्या अटकेची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने पांडेच्या आमिषांना बळी पडलेले अनेकजण तक्रार देण्यासाठी आता पुढे येत आहेत.


थापा मारून लुटायचा पैसे

मुंबईच्या येलो गेट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले अनंतप्रसाद देवीदास पांडे ठाण्यात रहातात. पण ते आपण केंद्रीय गुन्हे अन्वेय शाखेचे अधिकारी असल्याचे सर्वांना सांगायचे. आपले रेल्वे, म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबध असल्याचं सांगत कुणाला म्हाडाकडून स्वस्तात घर देतो. तर तरुणांना रेल्वेत नोकरीला लावण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे. आतापर्यंत त्यांच्या विरोधात ८ जणांनी ठाण्याच्या कासारवाडी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत.


असे अडकले जाळ्यात

काही दिवसांपूर्वी ठाण्यात राहणारे तक्रारदार महेश पालीवाल यांची ओळख पांडे यांच्याशी झाली. आपण पोलिस दलात मोठ्या पदावर कार्यरत असल्याची थाप पांडे यांनी पालीवाल यांनाही दिली. त्यावेळी पालीवाल यांना वाईन शाॅपचं लायसन्स मिळवून देण्याचं आमिष पांडेने त्यांना दिलं. या कामाचे पांडेने लाखो रुपये पालीवाल यांच्याकडून उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतर पांडे काम करण्याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे द्यायचा.

एका ओळखीच्या व्यक्तीकडून पांडे याने अनेकांना अशा प्रकारे गंडवल्याचं कळाल्यानंतर राकेश यांनी कासारवाडी पोलिस ठाण्यत पांडे विरोधात गुन्हा नोंदवला. त्यानुसार पोलिसानी सोमवारी पांडेला अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा