व्यसनासाठी चोरी ते खंडणीचा प्रवास

इरफान मेमनला दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मित्रांमधून वाईट सवयी लागल्या. या मित्रांच्या संगतीत तो अमली पदार्थाच्या आहारी गेला. हा प्रकार इरफानच्या घराच्यांना कळताच त्यांनी त्याचं व्यसन सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. पूर्वी गाड्यांच्या काचा फोडून हाताला लागेल ती वस्तू चोरून तो नशा करायचा. पण हे पैसेही पुरे पडत नसल्यामुळे त्याने मोठ मोठ्या गुंडांच्या नावाने धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केला.

व्यसनासाठी चोरी ते खंडणीचा प्रवास
SHARES

आॅनलाइन 'पोकर गेम' चालवणाऱ्या कंपनीचा संचालक अमिन रोझानी यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इरफान मेमनला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी इरफान मेमन विरोधात ३३३ पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे. आतापर्यंत व्यसनाच्या चसक्यासाठी मुंबईत चोऱ्या करत फिरणाऱ्या इरफानची मजल आता खंडणीपर्यंत पोहचल्याचं यातून दिसून आलं आहे.


दोषारोप पत्र तयार

दोषारोप पत्रात पोलिसांनी अठराहून अधिक जणांचे जबाब, मोबाइल मधील व्हाॅट्स अप चॅट, व्हिडिओ क्लिप सीडीतील संभाषण, फोन डिटेल्सचा समावेश आहे. अमिन रोझानीला धमकवण्यापूर्वी त्याने स्वतःच्या नातेवाईकाला कुख्यात गुंड फहीम मचमचच्या नावाने पैशांसाठी धमकावल्याचं तपासात पुढं आलं आहे.


कोण होता इरफान मेनन?

उच्चभ्रू कुटुंबातला.. बीएमडब्ल्यूतून फिरणारा... कायम एसीत राहणाऱ्या इरफानला अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने आता पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. नशा करण्यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. खाणं-पिणं, मौजमजा करणं आणि आलिशान गाड्यांतून फिरणं हा त्यांचा दिनक्रम होता.


गुंडांच्या नावाने धमक्या

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मित्रांमधून इरफानला वाईट सवयी लागल्या. या मित्रांच्या संगतीत तो अमली पदार्थाच्या आहारी गेला. हा प्रकार इरफानच्या घराच्यांना कळताच त्यांनी त्याचं व्यसन सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. पूर्वी गाड्यांच्या काचा फोडून हाताला लागेल ती वस्तू चोरून तो नशा करायचा. पण हे पैसेही पुरे पडत नसल्यामुळे त्याने मोठ मोठ्या गुंडांच्या नावाने धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केला.


काय आहे प्रकरण?

वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्त्या शबनम शेख यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी हरिश यादव, बिलाल कुतूबुद्दीन, शार्पशूटर जगबीर, संतोष सिंग, राहुल अमील मो. शमसुल इस्लाम आणि झुबेर खान याला अटक केली. त्यानुसार पोलिस चौकशीत बिलाल आणि जगबीरने आपल्याला फहीम मचमचने शबनम शेखसोबतच पवईतील हिरानंदानी बंधू आणि वांद्र्यातील पोकर गेमचा संचालक अमिन रोझानी याचीही सुपारी दिल्याचं सांगितलं.


मोमीनवर जबाबदारी

इतर शार्पशूटर मुंबईतलं काम घेत नसल्यामुळे फहिमने जगबीरलाच इतर ३ व्यावसायिकांची माहिती गोळा करण्यास सांगितली होती. मात्र जगबीरला अटक झाल्यानंतर इरफान मेमनवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार अमिनच्या घराबाहेर हेरगिरी करताना, अमिनच्या गाडीसोबत फोटो काढतानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर इरफानला पोलिसांनी अटक केली.


इरफानचा हात

या सर्व प्रकरणामागे इरफानचाच हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. इरफान विरोधात मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यासह ४० हून अधिक गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्या विरोधात दोषारोपपत्र ही दाखल केलं आहे. मात्र सर्व गुन्ह्यात इरफान जामिनावर बाहेर आहे. त्याच्याविरोधात ८० गुन्हे दाखल असल्याचं पुढं आलं आहे.


फोन नेमके कुठून?

इरफान मेमनचा भाऊ इम्रान व अमिन हे दोघेही चांगले मित्र असून अनेक व्यवसायात ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळे अमिन यांना त्रास दिल्यास त्याच्या भावालाही त्रास होईल व आपला उद्देशही साध्य होईल या हेतूनं इरफानने अमिनला टार्गेट केलं. या उद्देशाने त्याने फहीम मचमचला अमिनची माहिती दिल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं.


धमक्या सुरूच

अमिन यांना पाकिस्तान आणि दुबईतून फोन आल्याचं प्राथमिक तपासानुसार स्पष्ट होत आहे; पण ते खरोखरच परदेशातून आले की मेमनने तंत्रज्ञानाच्या आधारे हे सर्व काॅल केले याचा पोलिस तपास करत आहेत. मात्र इरफानच्या अटकेनंतरही त्यांना धमक्या येणं सुरूच आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा-

'पोकर गेम'च्या संचालकाला धमकावणारा अटकेत

बिग बाॅसमधील स्पर्धक झुबेर खानला अटक, सलमानवर केले होते आरोप



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा