६० बाईक्सचे पैसे घेऊन शोरूम मालक फरार, ग्राहकांची मोठी फसवणूक


६० बाईक्सचे पैसे घेऊन शोरूम मालक फरार, ग्राहकांची मोठी फसवणूक
SHARES

तुम्ही एखाद्या शोरूमध्ये जाऊन बाईक बुक केलीत आणि डाऊन पेमेंट भरूनही तुम्हाला बाईक मिळाली नाही, तर काय कराल? अशीच एक घटना बोरीवलीत घडली असून बाईकच्या शोरूम मालकाने तब्बल ६० ग्राहकांकडून डाऊन पेमेंट घेऊन पळ काढला आहे.


काय आहे प्रकरण?

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, बोरीवली आणि कांदिवली पोलिसांना या संदर्भात ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व ग्राहकांनी जैन आॅटो शोरूम येथे जाऊन दिवाळीच्या अगोदर बाईकसाठी डाऊन पेमेंट भरलं होतं. दिवाळीत त्यांना बाईक मिळणं अपेक्षित होतं. मात्र जेव्हा हे ग्राहक बाईकचा ताबा घेण्यासाठी शोरूममध्ये गेले, तेव्हा त्यांना शोरूम बंद असल्याचं आढळून आलं. हे शोरूम १९ आॅक्टोबरपासून बंद असल्याचं म्हटलं जात आहे.


फसवणुकीची तक्रार

यासंदर्भात बोरीवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक गुनाजी सावंत म्हणाले की, मागच्या आठवडाभरात ६० जणांकडून तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी जैन आॅटो शोरूमविरोधात तक्रार नोंदवली आहे. ग्राहकांची किमान २० लाख रुपयांची फसवणूक झाली असून ही रक्कम आणखी वाढू शकते.

बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे शोरूम २ ते ३ वर्षे जुने असून या शोरूममधील सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी शोरूम मालक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात भादंवि अंतर्गत ४२० अंतर्गत फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.



हेही वाचा -

 सावधान! इंटरनेटवर 'रीपर' व्हायरस वेगाने पसरतोय!

नेहरू नगरमध्ये अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, आरोपी पोलिसांच्या ताब्यात


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा