परळ स्थानकात महिलांकडे बघून 'तो' विकृत करत होता हस्तमैथुन

रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील पुरुषाच्या अश्लील वर्तनाबद्दल एका महिलेने तक्रार केली आहे.

परळ स्थानकात महिलांकडे बघून 'तो' विकृत करत होता हस्तमैथुन
SHARES

मुंबईतील परळ रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एक व्यक्ती हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.   रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील पुरुषाच्या अश्लील वर्तनाबद्दल तक्रार करण्यासाठी एका महिला प्रवाशाने ट्विटरवर तक्रार केली तेव्हा हा व्हिडिओ समोर आला.

त्या व्यक्तीच्या व्हिडिओसह ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करत तिने लिहिले: "मी हे तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छिते, काल परळ रेल्वे स्टेशनवर कामावरून घरी परतत असताना एक माणूस हस्तमैथुन करत होता. स्टेशन पोलिसांना फोन करेपर्यंत त्याने पुढची लोकल पकडली आणि तो गेला."

एका ट्विटर वापरकर्त्याने केलेल्या आणखी एका ट्विटने या घटनेची पुष्टी केली. या माणसाचा असाच व्हिडिओ शेअर करत, ट्विटर वापरकर्त्याने लिहिले: "हॅलो @MumbaiPolice, हा माणूस परळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांकडे पाहून हस्तमैथुन करताना दिसला. हा व्हिडिओ माझ्या एका मित्राने शूट केला आहे. मुंबई आता महिलांसाठी असुरक्षित झाली आहे का? ? हे भयंकर आहे! कृपया कारवाई करा."


सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर संतप्त प्रवाशांनी आरपीएफ आणि पोलिसांना टॅग केल्याने, आरपीएफने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.

ट्विटच्या खाली दिलेल्या प्रत्युत्तरात, RPF ने म्हटले: "आज, 13/04/2023 रोजी, DSCR/BB कडून Twitter द्वारे परळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी अश्लील कृत्य करत असल्याची तक्रार प्राप्त झाली. एएसआय एनआर कुंभार यांच्यासह परळ स्थानकावरील बंदोबस्त कर्मचारी दिनेश झोडिया यांनी परळ स्थानकाच्या फलाटाची पाहणी केली.

"स्टेशनच्या आवारात अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीची टीमने चौकशी केली. मात्र ती व्यक्ती कुठेच दिसली नाही. त्यांनी फलाटावरील प्रवाशांची आणि स्थानकाच्या आवारातील इतर लोकांचीही चौकशी केली. मात्र कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.

महिला प्रवाशांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गेल्या काही काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा कृत्यांना शक्य तितक्या कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.



हेही वाचा

सलमान खान धमकी प्रकरण : ठाण्यातून १६ वर्षीय तरुण ताब्यात

मुंबई लोकलमध्ये दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न , मुंब्रा स्थानकाजवळील घटना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा