मुंबई विमानतळावर पुन्हा पकडलं सोनं

 Mumbai Airport
मुंबई विमानतळावर पुन्हा पकडलं सोनं

मुंबई - विमानतळावर एकाच दिवशी एक कोटी 21 लाखांचं सोन पकडलं गेल्याने खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल चार किलो सोनं कस्टम विभागाने जप्त केलं आहे.

दुबईवरून आलेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्र. 984 या विमानात मोठा सोन्याचा साठा लपवण्यात आला असल्याची माहिती रविवारी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानंतर तत्काळ कस्टम विभागाने या विमानाची तपासणी केली असता प्रवासी सीटच्या खाली फॅब्रिक बेल्टमध्ये लपवलेली 20 सोन्याची बिस्किटे आणि एक सोन्याची चेन कस्टमच्या हाती लागली.

तब्बल दोन हजार 362 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत 71 लाख 66 हजार आहे. त्याच विमानातील फातिमा रसिना मोहम्मदकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 14 सोन्याची बिस्किटे जप्त केली. कस्टमची नजर चुकवण्यासाठी या महिलेलने ही बिस्किटे आपल्या अंतरवस्त्रात लपवली होती. एक हजार 632 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत 50 लाखांच्या घरात आहे.

Loading Comments