‘क्षणाची मजा आणि आयुष्यभराची सजा’

नशेच्या आहारी गेलेल्या मुलांपेक्षा आपल्या व्यावसायिक जीवनात रमलेल्या पालकांनाच आता झोपेतून जाग करायची वेळ आली आहे

‘क्षणाची मजा आणि आयुष्यभराची सजा’
SHARES

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या शिकवणीपासून आजचा तरुणवर्ग दुरावलाय. मुळात मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून द्यायला पालकांना वेळ कुठे आहे? नशेच्या आहारी गेलेल्या मुलांपेक्षा आपल्या व्यावसायिक जीवनात रमलेल्या पालकांनाच आता झोपेतून जाग करायची वेळ आली आहे. २०१९  अंमली पदार्थ विभागाने मुंबईत एकूण ११ ,७०६ नोंदवले असून पोलिस उत्कृष्ठ रित्या काम करत असल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

 एकेकाळी कष्ठकरांची ओळखली जाणारी मुंबई आता, अमली पदार्थ तस्करांसाठी महत्वाचे केंद्र ठरू लागली आहे. त्यांच्या दृष्टीने तस्करीसाठी मुंबई हे गोल्डन ट्रॅगंल बनलीय. आशियायी देश,दक्षिण अफ्रिका आणि युरोपातील देश, भारतातल्या वाढत्या भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन आपले जाळे भारतात विनत आहेत. त्याच मुंबई हे त्याचे केंद्र असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. अल्पावधीतच अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे लोक या धंद्याकडे ओढले जात आहेत. मुंबईत सुर्य अस्ताला गेला की मोठ मोठ्या हाॅटेलात आणि पबमध्ये हे चित्र पहायला मिळते. रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात तरुणाई अक्षरश: बेधूंद होऊन नाचत असते. पण या असंख्य दिव्यांच्या प्रकाशामागे ही दडलेला असतो. एक काळाकुट्ट अंधार आणि त्याच अंधारात चोरीछुपे चालतो नशेचा बाजार...उच्चभ्रूंच्या अशा पार्ट्यांमधून केटामाईन, इफेड्रीन, इन्फेटामाईन,कोरींगा, बीगा, ट्रॉमा, हेरॉईन हे अमली पदार्थ नशेबाजांना पुरवले जातात.या धंद्यातील उलाढाल अब्जावधी रुपयांच्या घरात आहे. मुंबईसह भारतात हा धंदा फोफावला आहे. अमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क थेट अमेरिका, कॅनडा, ब्रिटन पर्यंत जाऊन पोहोचलंय.

 असा सुरू आहे ड्रग्जचा व्यापार

२०१५ पर्यंत कोकेन, ब्राऊन शुगर, चरस या अमली पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. साऊथ अमेरिकेतून अफ्रिकेतील एका मध्यस्ती टोळीच्या मदतीने कोकन भारतात एअर पोर्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून आणले जाते. हे अमली पदार्थ नाकाने किंवा इजेक्शनद्वारे घेतले जाते. तर थायलंड, म्यानमार्क, लाओस येथील जंगलातून ब्राऊन शुगर किंवा हेराईन भारतात आणले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गाने हे अमली पदार्थ जम्मू आणि पंजाबमार्गे मुंबईत येऊ लागले आहेत. तर चरस जम्मू, हरियाणा, राजस्थान मार्गे मुंबईत येत असल्याचे पोलिस कारवाईतून पुढे आले आहे. बदलत्या काळाप्रमाणे नशेसाठी अमली पदार्थांचा ट्रेंडही बदलतो. सध्या भारतात‘एमडी’ या अमली पदार्थास मोठी मागणी आहे. अमली पदार्थ आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. एमडीसाठी तस्करांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे सहज आणि स्वस्ताच एमडी उपलब्ध होत असल्याने या अमली पदार्थाची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या अमली पदार्थाचे सेवन केल्याने डोळे मांजरीसारखे बारीक होतात. त्यामुळे त्याला‘मॅवमॅव’असे ही म्हटले जाते. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थातून एमडी बनवला जातो. कर्नाटकमध्ये राजकुमार नायडू या सुशिक्षित विद्यार्थ्याने या रासायनिक पदार्थातून अमली पदार्थ बनवण्याचा ५ वेळा प्रयत्न केला. मात्र ६ व्या वेळी त्याला यश आले. हे अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्याने मुंबईच्या वडाळा परिसरातील भंगारवाल्यांकडून घेतल्याचे तपासात पुढे आले होते.


काय आहेत ड्रग्जचे कोड

शहरात कोकेन, एम्फेटामाइन, हेरॉईन, एलएसडी पेपर हे सर्वपरिचित पदार्थ. यातील अफूपासून गर्द, हेरॉईन तयार होते. मार्फिन हेसुद्धा अफूपासून तयार केले जाते. कोकोच्या पानापासून कोकेन तयार केले जाते. इतर अमली पदार्थामध्ये मेथॅक्युलाॅन, अम्फेटामाईन, मेथअ‍ॅम्फेटामाईन आदींचा समावेश होतो. याशिवाय बटण गोळ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रायनॉक्सच्या गोळ्या,तसेच रेक्सकॉफ या खोकल्यावरील औषधाचा त्यात समावेश होतो. त्याच बरोबर ब्रेडला आयोडेक्स लावून खाण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. खोकल्याचे औषध अधिक प्रमाणात घेतले जात होते. मॅन्ड्रेक्सच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पादत्राणे चिटकविण्यासाठी वापरला जाणारा घट्ट द्रव पदार्थ, थीनर, व्हाईटनर आदींचा नशेसाठी वापर केला जात आहे. साखरेची भुकटी चांदीसारखा वर्ख असलेल्या कागदावर ठेवून त्याखालून आगपेटीच्या काडीने जाळायचा व त्याचा वास घ्यायचा. कमी बजेट असणाऱ्यांनी ही नवी शक्कल शोधली आहे. 

 एलएसडी पेपर ठरतयं डोकेदुखी

त्याच बरोबर एलएसडी पेपर हा अमली पदार्थाचा आणखी एक प्रकार आहे. ४० एलएसडी पेपर हे ९० हजार रुपयांना मिळतात. ऑनलाइन मिळणारे अमली पदार्थ ही मुंबई पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. सांकेतिक भाषेत त्याचे व्यवहार चालतात. त्यासाठी प्रत्येक अंमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी कोक, गांजासाठी वीड, हशीशसाठी हसत, एमडीसाठी बुक किंवा मॅवमॅव या सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात येतो. मात्र पोलिसांनी या नशेची तस्करी करणाऱ्या भोवती फास आवळल्यानंतर या तस्करांनी इंटरनेटवर चुकीच्या पद्धतीने जाहिरात करून नशेची विक्री करण्यास सुरूवात केली.

पिळदार शरीरयष्ठीसाठी ड्रग्जचा वापर

पिळदार शरीरयष्टीसाठी तरुणात असलेल्या क्रेझचा फायदा घेऊन घातक परदेशी उत्तेजक औषधांची(अंमली पदार्थांची) विक्री सध्या मुंबईत जोरात सुरू आहे.सुंदर व सळपातळ शरीरयष्टी कुणाचेही लक्ष वेधून घेते. नाजूक कंबर आणि सपाट पोटासाठी म्हणूनच महिलावर्गात शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. या बदल्या विचारण सरणीचा फायदा सध्या हे अंमली पदार्थांची तस्करी करणारे घेऊ लागले आहेत. परदेशी औषध किंवा आयुर्वेदीक औषधांच्या नावाखाली गलोगली यांनी अंमली पदार्थांती तस्करी करू लागले आहेत. नुकतीच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी डोंगरीतून एका मोठ्या तस्कराला अटक केली होती. या तस्करांच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आहे. कुणाला अल्पावधीतच पिळदार शरीरासाठी, कुणाला बारीक होण्यासाठी, कुणाला सेक्सताकद वाढवण्यासाठी तर कुणाला मानसिक तणावातून किंवा लक्ष केंद्रीत करण्याच्या नावाखाली तस्कर या अंमली पदार्थांची विक्री औषध म्हणून करत आहेत.माणसाला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या मादक पदार्थांची यादी आणि त्यामधील नफा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.रासायनिक किंवा आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांचे तस्कर तरुण आणि गरजूंना आपल्या विळख्यात ओढत असल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत पुढे आली आहे.हे रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत.

 

प्रकार      गुन्हे    अटक         प्रमाण         किंमत

हिराॅईन     २७    ३५        १४४८(ग्रॅम)    १ कोटी ८८ लाख ९३ हजार ६८५

 

चरस        ३०    ३३         १७ किलो    ६६ लाख ९१ हजार ८५०

 

कोकिन    ३५    ४८         १७ किलो     ५९ कोटी ३८ हजार ११५

 

गांजा        ४६०   ५२०        ११८१        २० कोटी ७५ लाख ९ हजार ७९९

 

एमडी        १२९    १५९        ८ किलो    ३७लाख ८२ हजार १ हजार ९०७

 

एलएसडी                १५६३(ग्रॅम)    १० लाख ९० हजार ५ हजार

 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा