चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं, हेअर स्टायलिस्टला पडलं महागात

केस आणि टी-शर्ट सुकवण्याच्या नावाखाली आरोपीने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.

चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं, हेअर स्टायलिस्टला पडलं महागात
SHARES

आज प्रत्येक तरुणीला वाटते की, आपण ही इतर सेलिब्रिटींप्रमाणे सुंदर दिसावे, आपले सौदर्य इतरांपेक्षा खुलून दिसावे. मात्र पार्लरमध्ये तरुणीचे केस धुताना तरुणीला चुकीचा स्पर्श करणे एका हेअर स्टायलिस्टला महागात पडलं आहे. या प्रकरणी व्हि.पी.रोड पोलिसांनी अल्ताफ सलमानी असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

व्हि.पी.रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये आली होती. त्यावेळी अल्ताफ सलमानीने फेशिअल केल्यानंतर तिचे केस धुतले. त्यावेळी त्याने तरुणीच्या केसावर जास्त पाणी ओतले. त्यामुळे तिचे टी-शर्ट ओले झाले. सलमानी त्या महिलेला दुसरे टी-शर्ट द्यायला तयार होता. पण त्या महिलेने नकार दिला. केस आणि टी-शर्ट सुकवण्याच्या नावाखाली आरोपीने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. त्यावरून तरुणीने अल्ताफ सलमानीला सुनावले. मात्र उर्मट अल्ताफ सलमानी तरुणीलाच उलट बोलू लागल्याने तरुणीने व्हि.पी.रोड पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी त्याला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा