अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला


SHARE

मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम याचा पॅरोल अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. मुंब्रा इथं राहणाऱ्या कौसर बहार हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अबू सालेमनं उच्च न्यायालयात पॅरोल अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं अबु सालेमला दिलासा देण्यास नकार दिला.


यापूर्वीही केला होता अर्ज

अबू सालेमच्या या याचिकेवर न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमानी आणि महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याआधी देखील अबू सालेमनं पॅरोल अर्ज दाखल केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणात्सोव तो फेटाळून लावण्यात आला होता. अबू सालेम सध्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे.


हेही वाचा - 

महिला शौचालयात अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक

सालेमच्या भेटीसाठी पोर्तुगाल दुतावास तळोजा कारागृहात

संबंधित विषय
ताज्या बातम्या