संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

  Uran
  संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी
  संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - उरणमध्ये चार सशस्त्र दहशतवादी दिसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून, त्यापैकी दोन संशयितांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेेत.

  मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणमध्ये शाळकरी मुलांना पाच ते सहा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्या होत्या. या व्यक्ती ओएनजीसी, स्कूल असे शब्द उच्चारत असल्याने मुलांनी याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि महाराष्ट्र पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्र प्रकाशित करत अधिक तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या संशयितांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असून, गुरुवारी रात्री मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.