वडाळा टीटी येथील हत्येचा पाच दिवसानंतर उलगडा

कुरेशीच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षक अजय बिराजदार यांचे पथक रवाना झाले. मात्र वेळोवेळी कुरेेेेशी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. अखेर कुरेशी हा उत्तर प्रदेशला त्याच्या मूळ गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वडाळा टीटी येथील हत्येचा पाच दिवसानंतर उलगडा
SHARES

मुंबईच्या वडाळा टीटी परिसरात क्षुल्लक कारणांवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची २० एप्रिल रोजी हत्या केली होती. पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अखेर पाच दिवसानंतर  अटक करण्यात वडाळा टीटी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत आहे.


घर खर्चावरून वाद

वडाळा टीटी परिसरातील झोपडपट्टीत फजुल रेेेेहमान कुरेशी उर्फ कप्तान कुरेशी हा त्याची पत्नी रिटा जैयस्वाल सोबत रहात होता. या दोघांमध्ये घर खर्चावरून वारंवार खटके उडायचे. छोटी-मोठी कामेे कुरेशी करायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवायचे. मात्र रिटा वारंवार पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचा. २० एप्रिल रोजी दोघांमध्ये क्षुल्लक  कारणांवरून वाद झाला. या वादात राग अनावर झालेल्या कुरेशीने पत्नी रिटाची हत्या करून घरातून पळ काढला.


उत्तर प्रदेशमधून अटक

या हत्येची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कुरेशी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.  कुरेशीच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षक अजय बिराजदार यांचे पथक रवाना झाले. मात्र वेळोवेळी कुरेेेेशी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. अखेर कुरेशी हा उत्तर प्रदेशला त्याच्या मूळ गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिराजदार यांच्या पथकाने त्याला मोठ्या शिताफीने अटक करत मुंबईला आणले.



हेही वाचा -

तरुणीसोबत अश्लील चॅटिंग पडलं महागात

भाजपाविरोधात व्हिडीओ टाकल्याने तरुणाला अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा